अमेरिकेत 24 तासात भारतीय वंशाच्या व्यक्तीवर दुसरा प्राणघातक हल्ला

By: | Last Updated: > Sunday, 5 March 2017 3:34 PM
sikh man injured in us after being shot at by unidentified person in washington

प्रातिनिधिक फोटो

न्यूयॉर्क : अमेरिकेत गेल्या 24 तासात भारतीय वंशाच्या व्यक्तीवर दुसरा प्राणघातक हल्ला झाल्याचं समोर आलं आहे. काल दक्षिण कॅरोलिनामध्ये हर्निश पटेल या 43 वर्षीय भारतीय वंशाच्या नागरिकाची गोळ्या झाडून हत्या झाल्याची घटना ताजी असताना, वॉशिंग्टनमधील केंटमध्ये आणखी एका 39 वर्षीय शीख नागरिकावर प्राणघातक हल्ला झाल्याचं समोर आलं आहे.

‘सिएटल टाईम्स’ या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, दीप राय नामक शीख व्यक्ती शुक्रवारी वॉशिंग्टन राज्यातील केंट शहरातल्या आपल्या राहत्या घराबाहेर गाडी दुरुस्त करत होता. त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर गोळ्या झाडल्या. पोलिसांच्या मते या दोघांमध्ये किरकोळ कारणावरुन वाद झाला.

तर हल्ल्यात जखमी झालेल्या राय यांनी सांगितलं की, त्या व्यक्तीने ‘माझ्या देशातून चालते व्हा’, म्हणत गोळ्या झाडल्या. हल्लेखोर हा सहा फुट उंचीचा असून, कृष्णवर्णीय असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. तसेच त्याने हल्ल्यावेळी आपल्या तोंडावर रुमाल बांधला असल्याची माहितीही त्यांनी सांगितलं.

या हल्ल्यासंदर्भात बोलताना, केंट पोलीस प्रमुख केन थॉमस यांनी आपण या घटनेकडे आपण गांभीर्याने पाहात असल्याचं सांगितलं. तसेच पोलिसांनी हल्लेखोराचा शोध घेण्यास सुरुवात केली असून, यासाठी एफबीआय आणि इतर संस्थांची मदत घेतली जात असल्याचीही माहिती दिली.

दरम्यान, गेल्या महिन्याभरापासून अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तींवर हल्ले होण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. महिनाभरापूर्वी भारतीय वंशाचा इंजिनिअर श्रीनिवासन यांच्यावरही अज्ञात हल्लेखोराने गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यानंतर कालच दक्षिण कॅरोलिनामध्ये हर्निश पटेल याचीही गोळ्या झाडून हत्या केल्याचं समोर आलं होतं.

तर दुसरीकडे भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी हर्निश पटेल यांच्या हत्येबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. तसेच हर्निश पटेल यांच्या हत्येचा तपास योग्य दिशेनं सुरु असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय.

संबंधित बातम्या

अमेरिकेत भारतीय वंशाच्या नागरिकाची गोळ्या झाडून हत्या

अमेरिकेमध्ये भारतीय इंजिनिअरच्या हत्येवर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले…

‘माझ्या देशातून चालता हो,’ अमेरिकेत भारतीय इंजिनिअरची हत्या

 

First Published:

Related Stories

'चना' आणि 'चना डाळ' शब्दांचा ऑक्सफर्ड डिक्शनरीत समावेश
'चना' आणि 'चना डाळ' शब्दांचा ऑक्सफर्ड डिक्शनरीत समावेश

लंडन : डाळ आणि ‘चना डाळ’ हा भारतीयांच्या जेवणात सर्रास वापरण्यात

युरोपमध्ये पुन्हा सायबर हल्ला, भारतालाही धोका
युरोपमध्ये पुन्हा सायबर हल्ला, भारतालाही धोका

मुंबई : वॉनाक्रायच्या दहशतीच्या महिन्याभरानंतर नव्या पीटरॅप

पासपोर्टचे रंग बदलले म्हणून रक्ताची नाती मिटत नाहीत : मोदी
पासपोर्टचे रंग बदलले म्हणून रक्ताची नाती मिटत नाहीत : मोदी

हेग : पासपोर्टचे रंग बदलले म्हणून रक्ताची नाती मिटत नाहीत, असे म्हणत

भारताकडे ग्लोबल इकॉनॉमिक पॉवर, नेदरलँडच्या पंतप्रधानांकडून मोदींचं स्वागत
भारताकडे ग्लोबल इकॉनॉमिक पॉवर, नेदरलँडच्या पंतप्रधानांकडून...

अॅमस्टरडॅम : अमेरिका दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट

सय्यद सलाउद्दीन आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित, पाकिस्तानचा तिळपापड
सय्यद सलाउद्दीन आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित, पाकिस्तानचा...

नवी दिल्ली : दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानच्या कुरापती चालूच

पंतप्रधान मोदी अमेरिकेहून थेट नेदरलँडला रवाना
पंतप्रधान मोदी अमेरिकेहून थेट नेदरलँडला रवाना

वॉशिंग्टन : दोन दिवसीय अमेरिकेच्या दौऱ्यानंतर भारताचे पंतप्रधान

मिसेस मोदींसाठी व्हाईट हाऊसच्या गार्ड्सनी दरवाजे उघडले?
मिसेस मोदींसाठी व्हाईट हाऊसच्या गार्ड्सनी दरवाजे उघडले?

वॉशिंग्टन : जगातील दोन शक्तिशाली देशांच्या प्रमुख नेत्यांची

... तर भारताला अमेरिकेशी जवळीक महागात पडेल, चीनची धमकी
... तर भारताला अमेरिकेशी जवळीक महागात पडेल, चीनची धमकी

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनींनी ओकली काश्मीरविरोधी गरळ
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनींनी ओकली काश्मीरविरोधी गरळ

तेहरान : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांनी ईदच्या दिवशी

मोदी भेटीदरम्यान मेलानिया यांनी परिधान केलेल्या ड्रेसची किंमत तब्बल...
मोदी भेटीदरम्यान मेलानिया यांनी परिधान केलेल्या ड्रेसची किंमत...

वॉशिंग्टन : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका आणि