स्टीफन हॉकिंग यांचे 10 प्रेरणादायी विचार

स्टीफन हॉकिंग हे जगभरातील अभ्यासकांचे प्रेरणास्त्रोत होते. हॉकिंग बोलणारं एक एक वाक्य हे प्रेरणादायी विचार म्हणून नोंदलं गेलं.

स्टीफन हॉकिंग यांचे 10 प्रेरणादायी विचार

केंब्रिज (इंग्लंड) : जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ प्रा. स्टीफन हॉकिंग यांचं केंब्रिजमधील राहत्या घरी निधन झालं. वयाच्या 76 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बिग बँग थिअरी, कृष्णविवरावरील हॉकिंग यांचं संशोधन भौतिकशास्त्रासाठी मोठं योगदान आहे.

केंब्रिजमधील निवासस्थानी बुधवारी सकाळी हॉकिंग यांची प्राणज्योत मालवली. हॉकिंग यांच्या मृत्यूबाबत कुटुंबीयांकडून माहिती देण्यात आली.

स्टीफन हॉकिंग हे जगभरातील अभ्यासकांचे प्रेरणास्त्रोत होते.  हॉकिंग बोलणारं एक एक वाक्य हे प्रेरणादायी विचार म्हणून नोंदलं गेलं.

स्टीफन हॉकिंग यांचे 10 प्रेरणादायी विचार

  1. गमती नसतील तर आयुष्य एक शोकांतिका ठरेल : स्टीफन हॉकिंग

  2. जरी मी हालचाल करु शकत नसलो, मला बोलण्यासाठी कॉम्प्युटरची मदत घ्यावी लागत असली, तरीही मी माझ्या मनातून मुक्त आहे – स्टीफन हॉकिंग

  3. नेहमी आकाशातील ताऱ्यांकडे पाहा, आपल्या पायाखाली पाहू नका. जे पाहाल, त्याचा अर्थ समजण्याचा प्रयत्न करा. कुतूहल जागरुक ठेवा.

  4. आयुष्य कितीही कठीण असलं तरी, त्यावर तुम्ही मात करु शकताच. तुम्ही यशस्वी व्हाल! : स्टीफन हॉकिंग

  5. आपल्याला जे जे करता येईल ते सर्व करायला हवं. मात्र जे आपल्या हातात नाहीत, त्याबाबत पश्चाताप करु नये : स्टीफन हॉकिंग

  6. दिव्यांगांना माझा सल्ला आहे, तुम्ही त्या गोष्टींवर लक्ष द्या, ज्या करण्यापासून तुम्हाला तुमचं अपंगत्व रोखू शकणार नाही, किंवा तुमचं अपंगत्व त्याआड येणार नाही. लक्षात ठेवा आत्म्या आणि शरीर दोन्हीही अपंग होऊ देऊ नका. : स्टीफन हॉकिंग

  7. आक्रमकता मनुष्याची सर्वात वाईट सवय आहे. आक्रमकता सभ्यतेचा नाश करते. : स्टीफन हॉकिंग

  8. कधीही करु शकत नाही असं काहीही नाही : स्टीफन हॉकिंग

  9. जे आपल्या बुद्ध्यांकाबद्दल/ IQ बद्दल दावा करतात, ते अयशस्वी असतात : स्टीफन हॉकिंग

  10. ब्रह्माण्डापेक्षा मोठं आणि जुनं काहीच नाही : स्टीफन हॉकिंग


संबंधित बातम्या

प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ प्रा. स्टीफन हॉकिंग यांचं निधन

विश्व शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Stephen Hawking Quotes in Marathi
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV