अमेरिकेच्या तीन शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्रातील नोबेल जाहीर

नोबेल समितीनं याबाबत माहिती देताना स्पष्ट केलं की, 'हॉल, रॉसबॅश आणि यंग यांनी बायलॉजिकल क्लॉक आणि त्याची अंतर्गत कार्यप्रणाली याबाबत अगदी महत्त्वपूर्ण संशोधन केलं आहे.'

अमेरिकेच्या तीन शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्रातील नोबेल जाहीर

स्टॉकहोम (स्वीडन) : वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली. जेफ्री सी हॉल, मायकल रॉसबॅश आणि मायकल यंग या अमेरिकेतील तीन वैज्ञानिकांची या सर्वोच्च पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

मानवाच्या अंतर्गत जीववैज्ञानिक चक्रासंबंधी (इंटरनल  बायलॉजिकल क्लॉक) या तीन शास्त्रज्ञांनी महत्वाचं संशोधन केलं असल्यानं त्यांची नोबेलसाठी निवड करण्यात आली आहे.

इंटरनल बायलॉजिकल क्लॉकला सर्केडियन रिदम या नावानंही ओळखलं जातं. ग्रह ज्याप्रमाणे दुसऱ्या ग्रहाभोवती परिक्रमा पूर्ण करतं त्याप्रमाणे सजीवांचं देखील चक्र सुरु असतं. यालाच इंटरनल  बायलॉजिकल क्लॉक असं म्हणतात. या क्रियेमुळेच जास्तीत जास्त लोकांमध्ये जागरण आणि झोप ही प्रकिया सुरु असते.

नोबेल समितीनं याबाबत माहिती देताना स्पष्ट केलं की, 'हॉल, रॉसबॅश आणि यंग यांनी बायलॉजिकल क्लॉक आणि त्याची अंतर्गत कार्यप्रणाली याबाबत अगदी महत्त्वपूर्ण संशोधन केलं आहे.'

इंटरनल बायलॉजिकल क्लॉक म्हणजे नेमकं काय?

इंटरनल बायलॉजिकल क्लॉक हे हार्मोन्स लेव्हल, झोप, शरीराचं तापमान आणि चयापचय क्रिया यासारख्या जैविक क्रियांना प्रभावित करतं. त्यामुळे जेव्हा व्यक्तीचं टाइम झोन बदलतं तेव्हा इंटरनल बायलॉजिकल क्लॉक आणि बाहेरील वातावरण यांचा तात्काळ ताळमेळ होत नाही.

या तीनही शास्त्रांनी याबाबत अतिशय महत्वाचे असे शोध लावल्यानं त्यांची या मानाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. गेल्या वर्षी जपानच्या योशिनोरी ओशुमी यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल जाहीर झालं होतं.

नोबेल समितीनं वैद्यक क्षेत्रातील पुरस्कार जाहीर केले असून आता येत्या काही दिवसात भौतिक, रसायनशास्त्र, शांतता, साहित्य आणि अर्थशास्त्र या नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यात येईल.

विश्व शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV