कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नीशी भेट, मात्र थेट बोलणं नाहीच!

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात या भेटीसाठी खास काचेच्या भिंतींची इंटरकॉम रुम तयार करण्यात आली होती. कुलभूषण जाधव यांना काचेची एका बाजूला बसले होते, तर दुसऱ्या बाजूला त्यांची आई आणि पत्नी बसली होती.

कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नीशी भेट, मात्र थेट बोलणं नाहीच!

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या जेलमध्ये कैदेत असलेले भारतीय नौदलाचे माजी कमांडर कुलभूषण जाधव अखेर कुटुंबीयांना भेटले. इस्लामाबादस्थित पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात कुलभूषण जाधव यांनी त्यांची आई आणि पत्नीची तब्बल दीड वर्षांनंतर भेट घेतली.

कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नी इस्लामाबाद येथे दाखल झाल्या. त्यानंतर कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत त्यांना पाकिस्तानातील भारतीय दुतावासात नेण्यात आलं. तिथून त्यांना परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात नेण्यात आलं. जिथे कुलभूषण आणि त्यांची भेट ठरली होती.

सात गाड्यांच्या ताफ्यात कुलभूषणना आणलं

काही अवधीत कुलभूषण जाधव यांना सात गाड्यांच्या ताफ्यात आणि कडेकोट सुरक्षेत पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात आणण्यात आले.

भेटीसाठी खास इंटरकॉम रुम

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात या भेटीसाठी खास काचेच्या भिंतींची इंटरकॉम रुम तयार करण्यात आली होती. कुलभूषण जाधव यांना काचेची एका बाजूला बसले होते, तर दुसऱ्या बाजूला त्यांची आई आणि पत्नी बसली होती.

Kulbhushan Jadhav Lead 2

कुलभूषण जाधव आणि त्यांची आई, पत्नी हे एकमेकांना दिसत होते, मात्र त्यांच्या मध्ये काचेची भिंत होती. त्यामुळे थेट संवाद साधणे शक्य नव्हते. संपूर्ण संवाद हा इंटरकॉमच्या म्हणजेच फोनच्या माध्यमातूनच झाला. संपूर्ण रुममध्ये कॅमेरे लावण्यात आले होते.

त्यामुळे काही अंतरावर असलेल्या आपल्या लेकाला मायेचा स्पर्शही कुलभूषण जाधव यांच्या आईला करता आला नाही.

40 मिनिटं भेट झाल्याची जिओ न्यूजची माहिती

नियोजित अर्ध्या तासाच्या भेटीचा अवधी ऐनवेळी वाढल्याचीही माहिती मिळते आहे. पाकिस्तानातील जिओ न्यूजच्या माहितीनुसार, कुलभूषण जाधव यांची त्यांची आई आणि पत्नीशी सुमारे 40 मिनिटं भेट झाली. त्यामुळे आधी 30 मिनिटं ठरलेली भेट, 10 मिनिटांनी वाढली.

कुलभूषण जाधवांच्या कथित कबुलनाम्याच्या व्हिडीओत 102 कट्स

कोण कोण उपस्थित होते?

कुलभूषण जाधव, त्यांची आई आणि पत्नी, यांच्यासोबतच पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्त जे पी सिंह इत्यादी उपस्थित होते. किंबहुना, कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीच्या संपूर्ण प्रवासात जे पी सिंह सोबत होते.

दरम्यान, कुलभूषण जाधव यांची  आई आणि पत्नी आजच भारतात परणार असल्याचं कळतं आहे.

kulbhushan Jadhav

3 मार्च 2016 रोजी कुलभूषण जाधवांना अटक

कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणेने बलुचिस्तानच्या सीमेवरुन 3 मार्च 2016 रोजी अटक केली होती. कुलभूषण जाधव यांच्यावर ‘रॉ’चे हेर असल्याचा आरोप पाकिस्तानकडून कुलभूषण जाधव यांच्यावर करण्यात आला. त्यानंतर चाललेल्या खटल्यात त्यांना रावळपिंडी कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली.

स्पेशल रिपोर्ट : पाकिस्तानने 'असं' अडकवलं कुलभूषण जाधवांना

कोण आहेत कुलभूषण जाधव?

कुलभूषण जाधव यांच्यावर ‘रॉ’चे हेर असल्याचा आरोप लावत बलुचिस्तान प्रांतातून त्यांना गेल्या वर्षी 3 मार्च 2016 मध्ये अटक झाली होती. जाधव कुटुंबीय मूळचे सांगलीतील असून, सध्या मुंबईत वास्तव्यास आहे.

कुलभूषण यांचे वडील मुंबई पोलिस दलाचे माजी कर्मचारी आहेत.

जाधव यांनी नौदलातून निवृत्ती स्वीकारुन व्यवसायाला सुरुवात केली होती. त्यामुळे आपला मुलगा हेर असल्याचा आरोप जाधव कुटुंबीयाने फेटाळून लावला आहे.

‘माझ्या मुलाला यात अडकवण्यात आलं आहे. कुलभूषण इराणच्या चबाहारमध्ये सल्लागार म्हणून व्यवसाय करतो,’ अशी माहिती त्यांच्या वडिलांनी दिली होती.

LIVE UPDATES :

  • कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नीशी भेट

https://twitter.com/geonews_english/status/945227070325579777

  • कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नी पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याच्या कार्यालयात दाखल

https://twitter.com/ANI/status/945210361740800000

  • कुलभूषण जाधव यांना 7 गाड्यांच्या ताफ्यात पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याच्या ऑफिसात आणलं

kulbhushan

  • कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नी पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याच्या कार्यालयात दाखल, काही वेळातच भेट होणार

https://twitter.com/ANI/status/945210361740800000

  • कुलभूषण जाधव यांचे कुटुंबीय पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याच्या कार्यालयात पोहोचले

live 1

  • कुलभूषण जाधव यांचे कुटुंबीय पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्तालयात दाखल

  • थोड्याच वेळात परराष्ट्र खात्याच्या कार्यालयात भेट होणार

  • कुलभूषण जाधव यांना भेटण्यासाठी कुटुंबीयांकडे केवळ अर्धा तास वेळ

  • कुलभूषण जाधव यांना भेटण्यासाठी त्यांची आई आणि पत्नी पाकिस्तानात दाखल

कुलभूषण यांना त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी पाकिस्तानकडून केवळ अर्धा तासांचा अवधी देण्यात आला आहे. यावेळी भारताचे उप-उच्चायुक्त जे पी सिंह सुद्धा उपस्थित असतील.

मानवतेच्या दृष्टीकोनातून कुलभूषण यांना आई आणि पत्नीला भेटण्यास परवानगी दिल्याचे पाकिस्तानकडून सांगण्यात आले होते. या भेटीबद्दल पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद फैझल यांनी अधिकृतरित्या सांगितले होते. त्यानंतर भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी त्यांची आई आणि पत्नीला यासंदर्भात माहिती दिली.

कुलभूषणच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेची हमी भारताने पाकिस्तानकडून घेतली आहे.

कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणेने बलुचिस्तानच्या सीमेवरुन 3 मार्च 2016 रोजी अटक केली होती. कुलभूषण जाधव यांच्यावर ‘रॉ’चे हेर असल्याचा आरोप पाकिस्तानकडून कुलभूषण जाधव यांच्यावर करण्यात आला. त्यानंतर चाललेल्या खटल्यात त्यांना रावळपिंडी कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली.

कोण आहेत कुलभूषण जाधव?

कुलभूषण जाधव यांच्यावर ‘रॉ’चे हेर असल्याचा आरोप लावत बलुचिस्तान प्रांतातून त्यांना गेल्या वर्षी 3 मार्च 2016 मध्ये अटक झाली होती. जाधव कुटुंबीय मूळचे सांगलीतील असून, सध्या मुंबईत वास्तव्यास आहे.

कुलभूषण यांचे वडील मुंबई पोलिस दलाचे माजी कर्मचारी आहेत.

जाधव यांनी नौदलातून निवृत्ती स्वीकारुन व्यवसायाला सुरुवात केली होती. त्यामुळे आपला मुलगा हेर असल्याचा आरोप जाधव कुटुंबीयाने फेटाळून लावला आहे.

‘माझ्या मुलाला यात अडकवण्यात आलं आहे. कुलभूषण इराणच्या चबाहारमध्ये सल्लागार म्हणून व्यवसाय करतो,’ अशी माहिती त्यांच्या वडिलांनी दिली होती.

विश्व शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: today, Kulbhushan jadhav’s mother and wife to visit pakistan latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV