- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -
डोनाल्ड ट्रंप यांनी ट्वीटमध्ये पाकिस्तानने दहशतवादाबद्दल कायम खोटं बोलून, अमेरिकेची फसवणूक केल्याचं ट्वीट काल केलं होतं. त्यात पाकिस्तानला अमेरिकेकडून सुरु असलेली मदत थांबवण्याचे संकेतही त्यांनी दिले होते.
दुसरीकडे ट्रम्प यांच्या ट्वीटची पाकिस्तानने चांगलीच धास्ती घेतली आहे. कारण, ट्रम्प यांच्या ट्वीटनंतर पाकिस्तानने हाफिज सईदच्या संस्था आणि आर्थिक संपत्ती ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. शिवाय, सद्यस्थितीवर चर्चेसाठी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासी यांची भेट घेतली आहे.
सध्या पाकिस्तानने हाफिज सईदच्या संघटना जमात-उद-दावाला मिळणाऱ्या आर्थिक देणग्यांवर बंदी घातली आहे. तसेच हाफिजची आणखी एक संघटना फलाह-ए-इंसानियत फाऊंडेशनच्या फडिंगवरही पाकने बंदी घातली आहे. सेक्यूरिटी ऑफ पाकिस्तानने याबाबतचा एक अध्यादेश काढून याची माहिती दिली.
दुसरीकडे पाकिस्तान सरकारने कराचीमधील अमेरिकी राजदूत डेव्हिड हेल यांना बोलावून घेतलं आहे, आणि ट्रम्प यांच्या ट्वीटविरोधात आपला विरोध दर्शवला आहे. तर, पाकिस्तान सरकारकडून आपल्यावर होणाऱ्या कारवाईमुळे हाफिज सईद चांगलाच संतापला आहे. त्याने या कारवाईचे खापर भारतावर फोडलं आहे.
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आत्तापर्यंतचा पाकिस्तानवरील सर्वात मोठा वज्रप्रहार असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानला मिळणाऱ्या मदतीवरुन अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाईम्समधूनही एक वृत्त प्रकाशित झालं होतं. या वृत्तानंतर अमेरिकेच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये एकच गोंधळ उडाला आहे.
संबंधित बातम्या
पाकिस्तान सईदच्या आर्थिक नाड्या आवळणार; संस्था, संपत्ती ताब्यात घेणार
हाफिज सईदला पुन्हा डांबलं, आंतरराष्ट्रीय दबावापुढे पाकिस्तान नमलं
पाकिस्तानने धोका दिला, आता आर्थिक मदत नाही, डोनाल्ड ट्रम्प बरसले
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद निवडणूक लढणार