पाकला होणारी लष्करी मदत बंद, अमेरिकेची कठोर पावलं

अफगाणिस्तानात अमेरिकन सैनिकांना लक्ष्य करणाऱ्या तालिबानींविरोधात कारवाई करण्यात पाकिस्तान सपशेल अपयशी ठरलं आहे. त्यामुळेच पाकला केली जाणारी सैन्याची मदत बंद करत असल्याचं अमेरिकेने म्हटलं आहे.

पाकला होणारी लष्करी मदत बंद, अमेरिकेची कठोर पावलं

न्यूयॉर्क : दहशतवादाविरोधात लढाईसाठी पाकिस्तानला अमेरिकेकडून होत असलेली आर्थिक मदत बंद करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या खोटारडेपणामुळे अमेरिकेने नाड्या आवळण्यास सुरुवात केली आहे.

पाकिस्तानला अमेरिकेकडून होत असलेली लष्करी मदतही थांबवण्यात आली आहे. दहशतवादाविरोधातील लढाईच्या बाबतीत पाक मूर्ख बनवत असल्याचं अमेरिकेने म्हटलं आहे.

अमेरिकेने पाकिस्तानला मिळणारी 255 मिलियन डॉलरची मदत थांबवली


अफगाणिस्तानात अमेरिकन सैनिकांना लक्ष्य करणाऱ्या तालिबानींविरोधात कारवाई करण्यात पाकिस्तान सपशेल अपयशी ठरलं आहे. त्यामुळेच पाकला केली जाणारी सैन्याची मदत बंद करत असल्याचं अमेरिकेने म्हटलं आहे.

पाकिस्तानने धोका दिला, आता आर्थिक मदत नाही, डोनाल्ड ट्रम्प बरसले


दहशतवादाविरोधात पाकिस्तानने ठाम भूमिका घेतल्यास त्यांना निधी मिळू शकेल, असं अमेरिकेतर्फे सांगण्यात आलं. नववर्षाला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानविरोधात संताप व्यक्त केला होता. गेल्या 15 वर्षांत 33 अब्ज यूएस डॉलरच्या मोबदल्यात पाकने खोटारडेपणा आणि फसवणूक केली, तसंच दहशतवाद्यांसाठी सुरक्षित आश्रय निर्माण केला, असं ट्रम्प म्हणाले.

विश्व शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: US suspends security assistance to Pakistan latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV