अमेरिकेने हल्ला केल्यास उत्तर कोरियाचं काय होईल?

डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या धमकीनंतर आतापर्यंत किम जोंगची काहीही प्रतिक्रिया आलेली नाही.

अमेरिकेने हल्ला केल्यास उत्तर कोरियाचं काय होईल?

मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाला कठोर शब्दात ठणकावलं आहे. अमेरिकला काही धोका निर्माण झाल्यास उत्तर कोरियाला नेस्तनाबूत करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नसेल, असा इशारा ट्रम्प यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेत दिला.

ट्रम्प यांच्या वक्तव्याचा अमेरिकेत विरोध

डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंगला वठणीवर आणण्यासाठी हा इशारा दिला असला तरी या वक्तव्याचा अमेरिकेतच निषेध करण्यात आला. ट्रम्प यांचं हे वक्तव्य धोकादायक आहे, जगातील एका मोठ्या देशाच्या नेत्याने करण्यासारखं हे वक्तव्य नाही, असं हिलरी क्लिंटन यांनी म्हटलं आहे.

चीन आणि रशियाचा युद्ध सराव

चीन आणि रशियाच्या सैन्याने उत्तर कोरियाच्या जवळ युद्धाचा सराव सुरु केला आहे. हा युद्ध सराव ज्या ओखोत्सक समुद्रात केला जात आहे, तो समुद्र उत्तर कोरियापासून 2 हजार किमी अंतरावर आहे. ट्रम्प यांनी दिलेल्या धमकीनंतर आतापर्यंत किम जोंगची काहीही प्रतिक्रिया आलेली नाही.

अमेरिकेने हल्ला केल्यास उत्तर कोरियाचं काय होईल?

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सैन्याला युद्धाचा आदेश दिल्यानंतर उत्तर कोरियाला अमेरिकन सैन्याकडून वेढा दिला जाऊ शकतो. उत्तर कोरियाच्या उत्तरेला चीन, दक्षिणेला दक्षिण कोरिया, पूर्वेला पिवळा समुद्र आणि पश्चिमेला जपानचा समुद्र आहे.

उत्तर कोरियापासून जवळपास 7 हजार किमी अंतरावर अमेरिकेची पॅसिफिक कमांड आहे. ज्याकडे, विमानवाहकांसह 200 पेक्षा जास्त वॉरशिप, जवळपास एक हजार पेक्षा जास्त लढाऊ विमानं आहेत. जवळपास 3400 किमी अंतरावर गुआममध्ये 4 हजार जवान, बी-52 बॉम्बर्ससहित फायटर जेट तैनात आहेत.

जपानमध्येही जवळपास 40 हजार जवान, अमेरिकन नेव्हीची सातवी फ्लीट ज्यामध्ये 60-70 वॉरशिप, 140 लढाऊ विमानं आणि 12 पेक्षा जास्त आण्विक पानबुड्या आहेत. तर दक्षिण कोरियामध्ये 35 हजार जवान, 300 पेक्षा जास्त टँक आणि अँटी मिसाईल सिस्टम तैनात आहे.

हल्ल्यात अमेरिकेचे विमानवाहक सर्वात मोठी भूमिका निभावतील. कारण उत्तर कोरियाकडे एकही एअरक्राफ्ट कॅरियर नाही. त्यामुळे अमेरिकेकडून उत्तर कोरियाला एअरक्राफ्ट कॅरियरच्या माध्यमातून चारही बाजूंनी घेरलं जाऊ शकतं आणि यातून फायटर जेट्स उत्तर कोरियाला नेस्तनाबूत करु शकतात.

दक्षिण कोरियात तैनात असलेलं अमेरिकन सैन्यही मैदानात उतरणार

उत्तर कोरियाच्या जवळील समुद्रात तैनात असलेले डिस्ट्रॉयर्स मिसाईल आणि एअर डिफेंसच्या माध्यमातून उत्तर कोरियावर मात करु शकतात. तर दक्षिण कोरियातील अमेरिकन सैन्य उत्तर कोरियाच्या दक्षिणेकडून हल्ला चढवू शकतं.

उत्तर कोरियाही पूर्ण ताकद लावणार

युद्धाची परिस्थिती उद्भवल्यास उत्तर कोरियाही अमेरिकेशी दोन हात करण्यासाठी तयार असेल. उत्तर कोरियाकडे जवळपास पावणे दहा लाख सैनिक आहेत. तर मोठ्या प्रमाणात लढाऊ विमानंही उत्तर कोरियाकडे आहेत. याशिवाय उत्तर कोरियाकडे असणारी मिसाईल युद्धात निर्णायक ठरतील.

संबंधित बातम्या :

... तर उत्तर कोरियाला पूर्णपणे उद्ध्वस्त करु, ट्रम्प यांचा थेट इशारा


जगासाठी डोकेदुखी ठरलेल्या उत्तर कोरियाचं भारत कनेक्शन!


उत्तर कोरियाच्या कुरघोड्या सुरुच, जपानवरुन मिसाईलची चाचणी


युद्धखोर उत्तर कोरियाच्या नाकेबंदीसाठी संयुक्त राष्ट्रसंघाचे निर्बंध


अण्वस्त्र निर्मिती सुरु करा, उत्तर कोरियाच्या मीडियाचं आवाहन

विश्व शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV