फेसबुक जाहिरातीनंतर महिलेची सायकलीसाठी 'चोराच्या घरातून चोरी'

लंडनमधील एका महिलेनं चोराकडून स्वत:चीच सायकल चोरी करुन परत मिळवली आहे. विशेष म्हणजे, यात तिला फेसबुकवरील जाहिरातीची मदत मिळाली.

By: | Last Updated: > Monday, 17 July 2017 11:08 AM
Woman Steals Her Bicycle Back From Thief

फोटो सौजन्य : द टेलिग्राफ

लंडन : काही वर्षांपूर्वी अक्षय कुमार, परेश रावल, सुनील शेट्टी त्रिकूटाचा रिलीज झालेला फिर हेराफेरी हा सिनेमा अतिशय लोकप्रिय झाला. या सिनेमात ‘चोर के घर से चोरी’ असा संवाद होता. पण ब्रिटनमध्ये असाच एक प्रकार समोर आला आहे. लंडनमधील एका महिलेनं चोराकडून स्वत:चीच सायकल चोरी करुन परत मिळवली आहे. विशेष म्हणजे, यात तिला फेसबुकवरील जाहिरातीची मदत मिळाली.

टेलिग्राफच्या वृत्तानुसार, लंडनच्या ब्रिस्टलमधील रहिवासी असलेल्या जेनी मार्टन-हम्फ्रेजची सायकल काही दिवसांपूर्वी चोरीला गेली होती. यानंतर तिने आपल्या सायकलीचा फोटो फेसबुकवर पोस्ट करुन मदतीचं आवाहन केलं होतं.

पण फेसबुकवर याच सायकलशी साधर्म्य असणाऱ्या अणखी एका सायकलची जाहिरात पोस्ट केली होती. फेसबुकवरील जाहिरात जेनीच्या मित्रानं पाहिलं, आणि जेनीशी संपर्क साधून याबाबतची माहिती दिली.

यानंतर जेनी आणि तिच्या मित्राने सायकल खरेदी करण्याच्या बहाण्याने जाहिरातदाराशी संपर्क साधला. शिवाय, चोरीला गेलेली आपली सायकल परत मिळवण्यासाठी स्थानिक पोलिसांकडे मदत मागितली. पण पोलिसांनी तिला नकार दिला.

यानंतर तिने जाहिरातदाराची भेट घेऊन, सायकलची टेस्ट ड्राईव्ह मागितली. जेनी ही ग्राहक असल्याचे समजून त्यानेही तत्काळ तिला टेस्ट ड्राईव्हची परवानगी दिली. यानंतर तिने टेस्ट ड्राईव्हसाठी सायकलवर स्वार होऊन, धुम ठोकली.

World News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Woman Steals Her Bicycle Back From Thief
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

शाहबाज शरीफ पाकिस्तानचे नवे पंतप्रधान
शाहबाज शरीफ पाकिस्तानचे नवे पंतप्रधान

इस्लामाबाद : नवाज शरीफ यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरुन

नवाज शरीफ यांना पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरुन हटवलं
नवाज शरीफ यांना पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरुन हटवलं

इस्लामाबाद : नवाज शरीफ यांना पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरुन हटवलं

VIDEO : झुलणारा भलामोठा पाळणा कोसळून मृत्यू
VIDEO : झुलणारा भलामोठा पाळणा कोसळून मृत्यू

ओहिओ : अमेरिकेतील ओहिओ शहरात राईड कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे. सोशल

पाकिस्तानातील लाहोरमध्ये स्फोट, 26 जणांचा मृत्यू
पाकिस्तानातील लाहोरमध्ये स्फोट, 26 जणांचा मृत्यू

लाहोर : पाकिस्तानमधील लाहोरमध्ये स्फोट झाला आहे. लाहोर शहरातील अरफा

आमच्या लष्कराला हरवणं अशक्य, चिनी लष्कराच्या प्रवक्त्याची दर्पोक्ती
आमच्या लष्कराला हरवणं अशक्य, चिनी लष्कराच्या प्रवक्त्याची...

बिजिंग : डोकलाम सीमावादवरून चीनने पुन्हा एकदा भारताला धमकवण्याचा

पाकिस्तानला झटका, अमेरिकेनं दोन हजार कोटींची आर्थिक मदत थांबवली
पाकिस्तानला झटका, अमेरिकेनं दोन हजार कोटींची आर्थिक मदत थांबवली

दिल्ली : दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या देशांच्या यादीत नाव आलेल्या

कपड्यांमधून 102 आयफोनची तस्करी, तरुणी अटकेत
कपड्यांमधून 102 आयफोनची तस्करी, तरुणी अटकेत

मुंबई : चीनमध्ये एका तरुणीला 102 आयफोनच्या तस्करीच्या आरोपात अटक

पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी ‘स्वर्ग’ : अमेरिका
पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी ‘स्वर्ग’ : अमेरिका

नवी दिल्ली : अमेरिकेने पाकिस्तानला मोठा धक्का दिला आहे.

सर्व सदस्यांनी धर्माचा त्याग करा, चीनमधील कम्युनिस्ट पार्टीचा आदेश
सर्व सदस्यांनी धर्माचा त्याग करा, चीनमधील कम्युनिस्ट पार्टीचा आदेश

बीजिंग : चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीने वादग्रस्त आदेश

बिजिंगमधील राजदुतांच्या परिषदेत चीनची भारताला धमकी
बिजिंगमधील राजदुतांच्या परिषदेत चीनची भारताला धमकी

बिजिंग : चीनचं सैन्य डोकलामधून मागं हटणार नाही, असं सांगत चीननं