प्रसिद्ध गणित तज्ज्ञ मरियम मिर्जाखानी यांचं प्रदीर्घ आजारानं निधन

गणित क्षेत्रातील प्रतिष्ठीत 'फील्ड्स मेडल' पुरस्कारनं गौरवण्यात आलेल्या जगातल्या पहिल्या गणित तज्ज्ञ मरियम मिर्जाखान यांचं अमेरिकेत निधन झालं आहे.

प्रसिद्ध गणित तज्ज्ञ मरियम मिर्जाखानी यांचं प्रदीर्घ आजारानं निधन

वॉशिग्टंन : गणित क्षेत्रातील प्रतिष्ठीत 'फील्ड्स मेडल' पुरस्कारनं गौरवण्यात आलेल्या जगातल्या पहिल्या गणित तज्ज्ञ मरियम मिर्जाखान यांचं अमेरिकेत निधन झालं आहे. त्या 40 वर्षांच्या होत्या. प्रदीर्घ काळापासून त्या ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत होत्या.

'फील्ड्स मेडल' हा पुरस्कार गणित क्षेत्रातील नोबेल पुरस्कार मानला जातो. मिर्जाखान यांना 2014 मध्ये 'कॉम्प्लेक्स जियोमेट्री अॅण्ड डायनामिकल सिस्टम्स'साठी या पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.

मरियम यांचा जन्म 1977 मध्ये इराणची राजधानी तेहरानमध्ये झाला. त्यांना तरुणपणी आंतरराष्ट्रीय मॅथेमॅटिकल ओलंपियाडमध्ये दोन सुवर्ण पदाकांनी गौरवण्यात आलं होतं. तर 2004 मध्ये हॉर्वर्ड विद्यापीठाने पीएचडी प्रदान केली होती.

त्यांच्या निधाननं जगभरातून शोकव्यक्त होत आहे. त्यांचे मित्र फिरोज नादरी यांनी इंस्टाग्रामवरुन शोक व्यक्त केला आहे.

विश्व शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV