विश्वविक्रमी पिझ्झा... लांबी तब्बल 1.93 किलोमीटर!

By: | Last Updated: > Wednesday, 14 June 2017 1:16 PM
विश्वविक्रमी पिझ्झा... लांबी तब्बल 1.93 किलोमीटर!

कॅलिफोर्निया : कॅलिफोर्नियामध्ये दोन किलोमीटरचा पिझ्झा बनवण्यात आहे. जगातील सर्वात जास्त लांबीचा पिझ्झा अशी या पिझ्झाची नोंद झाली आहे. गेल्यावर्षी इटलीत बनवण्यात आलेल्या सर्वात जास्त लांबीच्या पिझ्झाचा विक्रमही कॅलिफोर्नियामधील या पिझ्झाने मोडला आहे.

कॅलिफोर्नियामधील ऑटो क्लब स्पीडवेमध्ये डझनभर शेफ आणि अनेक लोकांनी एकत्र येऊन रेकॉर्डब्रेक पिझ्झा बनवला. 1.93 किलोमीटर एवढी या पिझ्झाची लांबी आहे.

‘एफे’ या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, गिनीज बुकच्या प्रतिनिधींनीही या पिझ्झाला जगातील सर्वात जास्त लांबीचा पिझ्झा म्हणून गौरवले आहे.

हा पिझ्झा बनवण्यासाठी जवळपास 3 हजार 632 किलो पीठ, 1 हजार 634 किलो चीज आणि 2 हजार 542 किलो सालसा सॉसचा वापर करण्यात आला.

2016 साली इटलीमध्ये 6 हजार 82 फूट लांबीचा पिझ्झा बनवण्यात आला होता. त्यावेळी त्या पिझ्झाचीही गिनीज बुकमध्ये नोंद झाली होती. मात्र, आता कॅलिफोर्नियातील पिझ्झाने इटलीतील पिझ्झाचा लांबीचा विक्रम मोडला आहे.

पिझ्झा बनवण्यासाठी सलग आठ तास औद्योगिक ओव्हनचा वापर करण्यात आला होता. विशेष म्हणजे पिझ्झा बनवण्याच्या या कार्यक्रमात कुणीही सहभागी होऊ शकत होते. या कार्यक्रमातून मिळालेला पैसा फूड बँक आणि बेघर लोकांमध्ये वाटप केला जाणार आहेत.

First Published:

Related Stories

लहान मुलांच्या डोळ्यांसाठी खास टिप्स
लहान मुलांच्या डोळ्यांसाठी खास टिप्स

मुंबई: सध्या लहान मुलांच्या डोळ्यावर भल्या मोठ्या काचेचा चष्मा

रागावर नियंत्रण करणारी खास योगासने!
रागावर नियंत्रण करणारी खास योगासने!

मुंबई: आपली जीवनशैली सध्या फारच धकाधकीची झाली आहे. अशावेळी आपल्याला

मेनोपॉज अर्थात रजोनिवृत्ती काळात कोणती काळजी घ्यावी?
मेनोपॉज अर्थात रजोनिवृत्ती काळात कोणती काळजी घ्यावी?

मुंबई : रजोनिवृत्ती म्हणजे शेवटची पाळी. शेवटची पाळी येण्याआधी तीन

आता 'उबर'नं प्रवास करणाऱ्यांसाठी 'उबरपास' मिळणार!
आता 'उबर'नं प्रवास करणाऱ्यांसाठी 'उबरपास' मिळणार!

नवी दिल्ली : मोबाईल अॅपवर आधारित टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या ‘उबर’ने

सावधान... चिमुरड्यांच्या हातात स्मार्टफोन देण्याआधी 'हे' नक्की वाचा
सावधान... चिमुरड्यांच्या हातात स्मार्टफोन देण्याआधी 'हे' नक्की वाचा

मुंबई : अनेकदा मुलांनी शांत बसावं म्हणून काहीजण त्यांच्या हातात

ओंतारिओतील लाल कांदा कॅन्सरवर गुणकारी : संशोधन
ओंतारिओतील लाल कांदा कॅन्सरवर गुणकारी : संशोधन

टोरंटो : कॅनडातील ओंतारिओमधील लाल कांदा कर्करोगावर गुणकारी

ट्विटरवरुन पंतप्रधान मोदींकडून योगाचे धडे!
ट्विटरवरुन पंतप्रधान मोदींकडून योगाचे धडे!

नवी दिल्ली : 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा केला जातो. हेच

सावधान! सुट्टीत जास्त झोपाल, तर ‘हा’ त्रास होईल!
सावधान! सुट्टीत जास्त झोपाल, तर ‘हा’ त्रास होईल!

नवी दिल्ली : तुम्ही वीकेंडला अधिक झोप घेता? तर सावधान… कारण

पुरुषांपेक्षा महिलांची झोप जास्त असते?
पुरुषांपेक्षा महिलांची झोप जास्त असते?

नवी दिल्ली : कोण जास्त झोपतो, यावरुन अनेकदा पती-पत्नीमध्ये किंवा