'झोमॅटो' हॅक, 1.7 कोटी यूझर्सचा डेटा चोरी झाल्याची भीती

'झोमॅटो' हॅक, 1.7 कोटी यूझर्सचा डेटा चोरी झाल्याची भीती

मुंबई : भारतातील सर्वात मोठं ऑनलाईन रेस्टॉरंट गाईड अशी ख्याती असलेलं 'झोमॅटो' हॅक झाल्याची माहिती आहे. जवळपास 1 कोटी 70 लाख यूझर्सचा डेटा चोरीला गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. झोमॅटो वेबसाईटवर सुमारे 12 कोटी यूझर्स आहेत.

'एनक्ले' या ऑनलाईन हँडल यूझरने हा डेटा हॅक केल्याचा दावा केला आहे. 1.7 कोटी यूझर्सचा डेटा विकल्याचा धक्कादायक दावाही त्याने केला आहे. झोमॅटोकडूनही हे ऑनलाईन चौर्य घडल्याची कबुली देण्यात आली आहे.

दरम्यान, ईमेल आयडी आणि 'हॅश'च्या माध्यमातील पासवर्ड चोरीला गेले असून, ते हॅकरला मिळवता येणार नाहीत, असा दावा कंपनीने केला आहे. त्यामुळे यूझर्सचा डेटा सुरक्षित असल्याचं झोमॅटोचं म्हणणं आहे.

पेमेंटशी निगडीत माहिती इतरत्र साठवली असून क्रेडिट कार्ड डेटा किंवा तत्सम माहिती चोरीला गेली नसल्याचं झोमॅटोने म्हटलं आहे. त्यामुळे ही माहिती गोपनीय आणि सुरक्षित असल्याचं झोमॅटोने म्हटलं आहे.

ज्या यूझर्सना डेटाचोरीचा फटका बसला आहे, त्यांचे पासवर्ड खबरदारीचा उपाय म्हणून रिसेट करण्यात आल्याचंही झोमॅटोने स्पष्ट केलं आहे.

दीपेंदर गोयल आणि पंकज चढ्ढा यांनी 2008 मध्ये झोमॅटोची सुरुवात केली. या फूड वेबसाईटवर विविध रेस्टॉरंट्समधील मेन्यू, त्यांच्या स्पेशालिटी आणि त्यावर ग्राहकांनी दिलेले रेटिंग्ज आणि रिव्ह्यू पाहायला मिळतात. भारत, ऑस्ट्रेलिया, अमेरिकेसह 23 देशांमध्ये झोमॅटोचा बेस आहे.

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV